भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरुवात झाली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने खराब सुरुवातीनंतरही जबरदस्त फलंदाजी करत 208 धावा धावफलकावर लावल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत हार न मानता 4 गड्यांनी विजय संपादन केला. एक वेळ सामना भारतीय संघाच्या हातात असताना अठराव्या षटकात अचानक सामना भारताच्या हातून गेला.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार फिंच व युवा कॅमेरून ग्रीनने तुफानी खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाला सामन्यात ठेवले. मात्र ग्रीन, स्मिथ व मॅक्सवेल दोन षटकाच्या अंतरात बाद झाल्याने ऑस्ट्रेलियन संघ संकटात सापडलेला. टीम डेव्हिड व मॅथ्यू वेड हे मुक्तपणे धावा काढू शकत नव्हते.
अखेरच्या तीन षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 40 धावांची गरज होती. 18 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षल पटेल याला या षटकात चांगल्याच धावा फटकावल्या गेल्या. वेड व डेव्हिडने तीन षटकारांची आतिषबाजी करत या षटकात 22 धावा लुटल्या. विशेष म्हणजे या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर हर्षलने वेडचा झेलही सोडला होता.
त्यानंतर पुढील षटक टाकण्यासाठी आलेल्या भुवनेश्वर कुमार याच्यावर देखील वेडने हल्ला चढवला. त्याने भुवनेश्वरला सलग तीन चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुढे नेले. या षटकात एकूण 16 धावा निघाल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक धावा केवळ दोन शिल्लक राहिल्या. ज्या पॅट कमिन्सने चौकार ठोकत पूर्ण केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स, आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, द व्हर्लविंड्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश