---Advertisement---

अभिमानास्पद! भारतीय यष्टीरक्षक बनला अमेरिकेचा कर्णधार; अशी राहिलीय कारकीर्द

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 8:12 AM
monank-patel
---Advertisement---

सध्या यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू असून २३ ऑक्टोबर पासून सुपर -१२ सामन्यांना प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकदा टी २० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेतील पात्रता फेरीचे सामने नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी, अमेरिकेच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

अमेरिका क्रिकेटने यष्टिरक्षक फलंदाज मोनांक पटेलला टी२० संघाचे कर्णधारपद दिले आहे. त्याला ही जबाबदारी सौरभ नेत्रवलकरच्या जागी देण्यात आली आहे. मोनांक पटेल आगामी टी२० विश्वचषक पात्रता फेरीत अमेरिका क्रिकेटचे नेतृत्व करेल. तर मध्यक्रमातील फलंदाज ऍरॉन जोंसला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आधी पहावे लागले होते पराभव

सौरभ नेत्रवलकरच्या नेतृत्वाखाली अमेरिका संघाने आयसीसी टी२० विश्वचषक लीग स्पर्धेतील ९ पैकी ८ सामने गमावले होते. तर एकाच सामन्यात अमेरिका संघाला विजय मिळवण्यात यश आलेले. तर कॅनडा आणि बर्मुडा यांनी अमेरिका संघाला २ वेळेस पराभूत केले होते. ज्यामुळे अमेरिका क्रिकेटने टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.

तसेच मोनांक पटेलबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २०१८ मध्ये पनामा संघाविरुद्ध पदार्पण केले होते. तेव्हापासून तो अमेरिका संघाचे प्रतिनिधित्व करतोय. गेल्या काही महिन्यांपासून त्याने वनडे क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने यावर्षी ओमानमध्ये खेळलेल्या ६ वनडे सामन्यात ५९.५ च्या सरासरीने २३८ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने एक अर्धशतक देखील झळकावले होते.

टी -२० विश्वचषक पात्रता फेरीसाठी असा आहे अमेरिका संघ –

मोनांक पटेल (कर्णधार), ऍरॉन जोंस (उपकर्णधार), अली खान, एलमोर हचिंसन, गजानंद सिंग, इयान हॉलेंड, जसकरन मल्होत्रा, करीमा गोर, निसर्ग पटेल, रस्टी थेरॉन, सौरभ नेत्रवलकर, स्टीवन टेलर, ट्रिनसन कारमाइकल आणि जेवियर मार्शल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---