यावर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला. उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर भारतीय संघ आणि खेळाडू टीकाकारांच्या चांगलेच निशाण्यावर आले आहेत. आता यामध्ये इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पानेसर याच्या नावाची भर पडली आहे. आता तीन भारतीय क्रिकेटपटू निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले.
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये भारत चांगले प्रदर्शन करत होता. साखळी फेरीत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने भारतीय संघाने जिंकले. मात्र, उपांत्य सामन्यात मात्र त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. टी20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर चाहते संघावर नाराजी व्यक्त करत आहेत. खासकरून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंवर सर्वांचीच नाराजी दिसून येतेय.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पानेसर याने भारतीय संघाच्या पराभवानंतर बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“भारतीय संघाने सर्वांना निराश केले. उपांत्य सामन्यात बटलर व हेल्सने भारतीय गोलंदाजांना अक्षरशा जेरीस आणले. भारतीय गोलंदाजांना काय करावे हे देखील समजत नव्हते. तुम्हाला लढत देण्याची गरज असते. 168 या त्यामानाने मोठ्या धावा होत्या.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“लवकरच भारतीय टी20 संघातून काही खेळाडू निवृत्त होतील. कर्णधार रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन व दिनेश कार्तिक यांचा त्यात समावेश असेल. संघ व्यवस्थापन नक्कीच या सर्वांशी चर्चा करेल. कारण, आता युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे.”
पानेसरने यावेळी विराट कोहली हा मात्र पुढील विश्वचषकात दिसू शकतो असे भाकीतही केले. विराट या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
(Monty Panesar Said Rohit Ashwin Karthik Will Retire Soon)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’
पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेल्या सॅमीने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण; म्हणाला…