पुणे | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे पार पडलेल्या दुसऱ्या मालाज रवाईन र
रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित रवाईन रन माउंटन मॅरेथॉन हि स्पर्धा 21किलोमीटर, 10किलोमीटर प्रकारात पार पडली. स्पर्धेत एकूण 1200धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेला पाचगणी येथील संजीवन हायस्कुल येथून प्रारंभ झाला आणि संपूर्ण शहरातून तसेच ऐतिहासिक सेंट पिटर्स स्कुल येथून आणि ऐतिहासिक अशा भव्य वृक्ष राजीतून आणि पाचगणी व महाबळेश्वरच्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगामधून, तसेच राजपुरी केव्स मार्गे पुन्हा फिरून संजीवन मैदान असा मार्ग स्पर्धकांना पूर्ण करावयाचा होता.
हाफ मॅरेथॉन(21कि.मी.)खुल्या पुरुष गटात ज्ञानेश्वर मोर्घाने 01:14:29सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, प्रल्हाद सिंग व केनियाच्या मायकेल बीव्होत तिसरा क्रमांक पटकावला. याच महिला खुला गटात प्राजक्ता गोडबोले हिने 01:29:41सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. 10कि.मी. खुल्या पुरुष गटात केनियाच्या अॅमानुएल आब्दू याने 00:34:56सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर, महिला गटात शितल भगतने 00:44:53सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले.
स्पर्धेत एकूण 7लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात आली. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ अमिन हाजी(पाचगणी स्वच्छ सर्वेक्षण २०१८चे ब्रँड अँबॅसिडर) व आयएएस खैलाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार):
हाफ मॅरेथॉन 21कि.मी. पुरुष खुला गट: 1. ज्ञानेश्वर मोर्घा(01:14:29से), 2.प्रल्हाद सिंग(01:16:49से), 3.मायकेल बीव्होत(01:17:22से);
हाफ मॅरेथॉन 21कि.मी. महिला खुला गट: 1. प्राजक्ता गोडबोले(01:29:41से), 2.जनाबाई हिरवे(01:29:42से), 3.नयन(01:49:48से);
10कि.मी. पुरुष खुला गट: 1.अॅमानुएल आब्दू(00:34:56से), 2.आदिनाथ भोसले(00:35:44से), 3.सुशांत जेदे(00:38:05से);
10कि.मी.महिला खुला गट: 1.शितल भगत(00:44:53से), 2.आकांक्षा शेलार(00:46:53से), 3.कविता भोईर(00:47:57से).