अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद 307 धावा करत पहिल्या डावातील 15 धावांच्या आघाडीसह आॅस्ट्रेलियासमोर 323 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले आहे.
भारताच्या या डावात चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिषभ पंत आणि मोहम्मद शमी या सहा फलंदाजांना आॅस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने बाद केले. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.
भारताविरुद्ध कसोटीत त्याने सहाव्यांदा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
त्यामुळे त्याने इंग्लंडचे माजी अष्टपैलू इयान बॉथम, पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान आणि विंडीजचे माजी गोलंदाज मालकोम मार्शल यांच्यासह कसोटीत भारताविरुद्ध सर्वाधिक वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत संयुक्तरित्या दुसरे स्थान मिळवले आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने 7 वेळा भारताविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर लायनने कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, इशांत शर्मा, केएल राहुल आणि आर अश्विन या फलंदाजांना त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक वेळा बाद केले आहे.
लायनने कसोटीत पुजाराला एकूण 8 वेळा, रहाणेला 7 वेळा, कोहली आणि इशांतला प्रत्येकी 6 वेळा, अश्विन आणि रोहितला प्रत्येकी 5 वेळा आणि राहुलला 4 वेळा बाद केले आहे.
कसोटीत भारताविरुद्ध सर्वाधिक वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज-
7 – मुथय्या मुरलीधरन
6 – इयान बॉथम
6- इम्रान खान
6- मालकोम मार्शल
6 – नॅथन लायन
5 – रिची बेनॉड
5 – डेल स्टेन
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का
–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचा कॅनडावर विजयी पंच, उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश
–एकेकाळी आॅस्ट्रेलियाला नडलेला भारतीयच आला विराटच्या मदतीला
–८७ वर्षांत जे कुणालाही जमलं नाही ते विराटने करुन दाखवलं