---Advertisement---

धोनीच्या कर्णधार म्हणुन केलेल्या त्या विक्रमाला विराटकडून मोठा धोका!

---Advertisement---

राजकोट | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारत विरुद्ध विंडीज सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली. १११ चेंडूंचा सामना करताना त्याने ५६ धावा केल्या आहेत.

यात त्याच्या ३ चौकारांचा समावेश आहे. याबरोबर विराटने कसोटीतील २०वे अर्धशतक पुर्ण केले आहे. विराटने आजपर्यंत कसोटीत २० अर्धशतके आणि २३ शतके केली आहेत. त्यातील कर्णधार म्हणुन त्याने १६ शतके आणि १० अर्धशतके केली आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून कर्णधार म्हणुन डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ४१ सामन्यात अशी कामगिरी केली आहे.

तर या यादीत अव्वल स्थानी असलेल्या एमएस धोनीने ६० सामन्यात २९वेळा अशी कामगिरी केली आहे.

कर्णधार म्हणुन सर्वाधिक वेळा डावात ५० किंवा अधिक धावा करणारे भारतीय खेळाडू-

२९- एमएस धोनी, सामने- ६०

२६- विराट कोहली, सामने- ४१

२५- सुनिल गावसकर, सामने- ४७

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment