---Advertisement---

गांगुली धोनीला १०९ कसोटी जे जमलं नाही ते एकट्या विराटने ५० कसोटीत करुन दाखवलं

On: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2019 4:27 PM
---Advertisement---

पुणे | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ५ बाद ६०१ धावा केल्या. विराट कोहलीने या सामन्यात नाबाद २५४ धावांची शानदार खेळी केली.

परंतु याचबरोबर विराटच्या नावावर एक खास विक्रम जमा झाला आहे. कसोटीत विराट कर्णधार असताना टीम इंडियाने तब्बल १० वेळा ६०० धावांचा टप्पा पार केला आहे.

असा कारनामा करणारा करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. बाकी कोणत्याही कर्णधाराला ५ पेक्षा जास्त वेळा असा विक्रम करता आलेला नाही.

अॅलन बाॅर्डर, एमएस धोनी, सौरव गांगुली आणि ग्रॅमी स्मिथ यांनी प्रत्येकी ५वेळा हा कारनामा केला आहे. हा कारनामा करण्यासाठी अॅलन बाॅर्डर ९३, एमएस धोनी ६०, सौरव गांगुली ४९ तर ग्रॅमी स्मिथ तब्बल १०९ कसोटी सामने खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment