भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (15 जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आधीच तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत 2-0 असा अजिंक्य आघाडीवर आहे. यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन बदल दिसले. तिरुअनंतपुरमच्या या वनडे सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळाली. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याच्या छोट्या खेळीत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रोहितने तिसऱ्या सामन्यात चांगली सुरूवात केली. त्याने भारताच्या डावातील 10व्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारला. तो 49 चेंडूत 42 धावा करत बाद झाला. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 2 चौकार मारले. याबरोबरच त्याने वनडेत श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू हा विक्रम केला. त्याने हा विक्रम करताना माजी कर्णधार एमएस धोनी याला मागे टाकले आहे.
वनडेमध्ये धोनीने श्रीलंकेविरुद्ध 45 षटकार मारले, तर रोहितचे आतापर्यंत 48 षटकार झाले आहेत. त्याचबरोबर एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे षटकार मारण्याच्या भारतीय खेळाडूंच्या यादीतही रोहितच पुढे आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 76 षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिन तेंडुलकरने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक असे 35 षटकार मारले आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रोहितचा हा विक्रम तोडण्याच्या कोणी जवळही नाही.
तिसऱ्या वनडेत रोहितला चमिका करुणारत्ने याने बाद केले. तो बाद झाल्यावर भारताची स्थिती एक विकेटवर 95 धावसंख्या अशी होती. पुढे दुसरा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने शतकी खेळी केली. रोहितने 2007मध्ये वनडेत पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 238 सामने खेळताना 48.71च्या सरासरीने 9596 धावा केल्या आहेत. यामध्ये 29 शतके, 3 द्विशतक आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडे सामन्यात संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू-
76*- रोहित शर्मा वि. ऑस्ट्रेलिया
48*- रोहित शर्मा वि. श्रीलंका
45 – एमएस धोनी वि. श्रीलंका
35 – रोहित शर्मा वि. वेस्ट इंडिज
35- – सचिन तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया
34 – एमएस धोनी वि. इंग्लंड
33- एमएस धोनी वि. ऑस्ट्रेलिया
(Most 6s by Indians vs Opponents in ODI, Rohit Sharma INDvSL 3rd ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध मैदानात पाय टाकताच विराटचे अर्धशतक, सचिन-धोनीसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील
शुबमन गिलने जिंकले दिल! तिरुअनंतपुरम वनडेत झळकावले कारकिर्दीतील दुसरे शतक