भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (दि. 03 जानेवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर ईशान किशन चांगलाच चमकला. त्याने मागील वर्षीच्या अखेरीची लय नवीन वर्षाच्या पहिल्या सामन्यातही कायम ठेवली. विशेष म्हणजे, त्याने विक्रम रचताच तो यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. चला तर पाहूयात काय आहे विक्रम…
झाले असे की, श्रीलंका (Sri Lanka) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, भारतीय (Team India) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना ईशान किशन (Ishan Kishan) याने गोलंदाजांचा घाम काढण्यास सुरुवात केली. भारतीय संघाचे इतर फलंदाज नियमित अंतराने बाद होत होते, पण ईशान एका बाजूने गोलंदाजांना चोप देत होता. यावेळी त्याने 29 चेंडूत 37 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 3 चौकारही मारले.
ईशान किशनचा विक्रम
ईशानने यावेळी 2 षटकार मारताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. त्याने आतापर्यंत टी20त 11 वेळा पहिल्या षटकात षटकार मारण्याची कामगिरी केली आहे.
At the halfway stage, #TeamIndia are 75/3
Live – https://t.co/uth38C9Zlh #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/V866sCZhmu
— BCCI (@BCCI) January 3, 2023
त्याच्यानंतर या यादीत तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) विराजमान आहे. सेहवागने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 4 वेळा पहिल्या षटकात षटकार मारण्याची कामगिरी केली आहे.
भारतीय संघाकडून पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
11 षटकार- रोहित शर्मा
5 षटकार- ईशान किशन*
4 षटकार- वीरेंद्र सेहवाग
भारताचा डाव
यावेळी फलंदाजी करताना भारतीय संघाकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. मात्र, दीपक हुड्डा (41), ईशान किशन (37), अक्षर पटेल (31) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (29) यांच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 162 धावांचा डोंगर उभा केला होता. (Most 6s for India in T20I ishan kishan 2nd in list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजाला गेला नडायला, पण नियम माहिती नसल्याने झम्पाची झाली फजिती; पाहा व्हिडिओ
श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; टीम इंडियाच्या दोन धुरंधरांचे टी20 पदार्पण