---Advertisement---

अश्विनला पुन्हा संघाबाहेर बसवताना टीम मॅनेजमेंट १० वेळा विचार करेल

On: शनिवार, ऑक्टोबर 5, 2019 2:47 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव सर्वबाद 431 धावांवर संपुष्टात आला आहे. या डावात भारताकडून आर अश्विनने 145 धावा देत 7 विकेट्स घेण्याची मोठी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने खास विक्रमही केला आहे.

अश्विनने या डावात एडेन मार्करम, थेऊनिस डी ब्रायन, फाफ डू प्लेसिस, क्विंटॉन डी कॉक, वर्नोन फिलँडर, केशव महाराज आणि कागिसो रबाडा या  दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंना बाद केले आहे. अश्विनची ही कसोटीत एका डावात 7 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची 5 वी वेळ आहे.

त्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात 7 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कपिल देव यांनीही 5 वेळा कसोटी डावात 7 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

यामुळे आता अश्विन या यादीत कपिल देवसह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर हरभजन सिंग आहे. त्याने 7 वेळा एका कसोटी डावात 7 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच या यादीत त्याच्या पाठोपाठ अनिल कुंबळे आहे. कुंबळेने 6 वेळा अशी कामगिरी केली आहे.

सध्या विशाखापट्टणमला सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपल्याने भारताने 71 धावांची आघाडी घेतली आहे.

कसोटीमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 7+ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

7 वेळा – हरभजन सिंग

6 वेळा – अनिल कुंबळे

5 वेळा – आर अश्विन

5 वेळा – कपिल देव

3 – सुभाष गुप्ते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment