---Advertisement---

खास कारनामा! आर अश्विन-हनुमा विहारीने तब्बल २८९ चेडूं खेळून मिळवले ‘या’ खास यादीत स्थान

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 7:01 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने हनुमा विहारी व रविचंद्रन अश्विन यांच्या अविश्वसनीय फलंदाजीने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे. या बरोबरच विहारी आणि अश्विन यांनी एक खास विक्रमही केला आहे.

विहारीने 6 व्या क्रमांकावर तर अश्विनने 7 व्या क्रमांकावर फलंदाजी केली. यावेळी या दोघांनींही एकत्र फलंदाजी करताना तब्बल 289 चेंडू खेळले आहेत. त्यामुळे त्यांनी अनिर्णित राहिलेल्या कसोटी सामन्यांत चौथ्या डावामध्ये 6 व 7 क्रमांकावर येवून सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या फलंदांजाच्या यादीत 5वा क्रमांक मिळवला आहे.

चौथ्या डावात 6 व 7 क्रमांकावर येवून अनिर्णीत कसोटी सामन्यात झालेल्या भागीदारीत सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा विक्रम फाफ डू प्लेसीस आणि जॅक कॅलिस यांच्या नावे आहे. फाफ व कॅलिस यांनी 2012 साली 486 चेंडू खेळलेले होते. यानंतर क्रमांक येतो तो इयान बेल आणि पॉल कॉलिंगवूड यांचा. बेल आणि कॉलिंगवूड यांनी 2010 साली 401 चेंडू खेळले होते. रसेल व स्मिथ यांनी 1995 साली 346 तर क्रिस क्रेन्स आणि एडम परोरे यांनी 1997 साली 291 चेंडू खेळलेले आहेत.

131 षटके फलंदाजी केली भारताने –

विशेष म्हणजे भारताने सामन्यातील चौथ्या डावात तब्बल 131 षटके फलंदाजी केली. पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झल्यानंतर सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झूकला होता. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजारा व रिषभ पंत आणि शेवटी विहारी व अश्विन यांनी उत्तम भागीदारी करत सामना अनिर्णित राखला. भारताच्या दुसऱ्या डावात विहारीने 161 तर अश्विनने 128 चेंडू खेळले आहेत हे विशेष.

महत्त्वाच्या बातम्या –

आजच्या खेळीने पंतच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच आशियाई यष्टीरक्षक

शाबास गड्यांनो…! अश्विन आणि विहारी यांच्या जोडीने रचलाय ‘हा’ कमाल विक्रम

सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---