कालपासून(22 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात हेडिंग्ले, लीड्स येथे तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यातील पहिल्या दोन डावात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचे मिळून एकूण 16 फलंदाज एकआकडी धावसंख्येवर बाद झाले आहेत.
त्यामुळे एका कसोटी सामन्यातील पहिल्या दोन डावात 16 फलंदाज एकआकडी धावसंख्येवर बाद होण्याची ही 1976 नंतरची दुसरीच वेळ आहे. याआधी 1976 ला मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज संघातील कसोटी सामन्यात पहिल्या दोन डावात इंग्लंडचे 9 तर वेस्ट इंडीजचे 7 फलंदाज, असे मिळून 16 फलंदाज एकआकडी धावसंख्येवर बाद झाले होते.
त्यानंतर आता इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघात लीड्समध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटीत पहिल्या दोन डावात इंग्लंडचे 9 तर ऑस्ट्रेलियाचे 7 फलंदाज मिळून एकूण 16 फलंदाज एकआकडी धावसंख्येवर बाद झाले आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 179 धावांवर तर इंग्लंडचा संघ त्यांच्या पहिल्या डावात 67 धावांवर बाद झाला आहे.
एका कसोटी सामन्यात पहिल्या दोन डावात एकअकडी धावसंख्येवर बाद होणारे सर्वाधिक फलंदाज –
16 फलंदाज – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, मँचेस्टर, 1976
16 फलंदाज – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लीड्स, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद करत ब्रॉडने केली अँडरसन, अश्विनच्या विक्रमाची बरोबरी
–६७ धावावंर सर्वबाद होत इंग्लंडने मोडला ११२ वर्षांचा नकोसा विक्रम
–रहाणेने सांगितले अश्विनला ११ जणांच्या टीम इंडियात संधी न देण्यामागील कारण