Loading...

का झाला एमएस धोनी राजकीय नेता, जाणून घ्या यामागील खरे कारण

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. विशेषत: 2019 विश्वचषकातील त्याच्या संथ खेळीमुळे, त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांमुळे आणि क्रिकेटमधून विश्रांती घेत भारतीय सेनेत काही दिवसांसाठी रुजू झाल्याने तो मागील काही दिवसात चांगलाच चर्चेत राहिला.

पण आता तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सध्या त्याचा राजकीय नेत्याच्या वेशभूषेतील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

धोनीच्या अशा फोटोमागील कारण म्हणजे त्याने मुंबईत एका जाहिरतीचे चित्रीकरण केले आहे. या जाहिरातीमध्ये तो राजकीय नेता बनला आहे. त्याचसाठी त्याने राजकीय नेत्याच्या वेशभूषेत फोटोशूट केले आहे.

या फोटोमध्ये धोनीने कुर्ता-पायजमा घातला असून डोक्यावर गांधी टोपी देखील आहे. तसेच त्याने राजकिय नेते निवडणूकांच्या रॅलीमध्ये ज्याप्रकारे हात जोडतात तसे त्याने हात जोडले आहेत.

Loading...

धोनीने सध्या भारताच्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतली होती. पण तो या दौऱ्यानंतर मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाशी जोडला जाण्याची शक्यता आहे.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

काय सांगता! एकाच टी२० सामन्यात शतक आणि ८ विकेट्स, भारताच्या कृष्णप्पा गॉथमचा पराक्रम

आज आहेत या दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंचे वाढदिवस!

डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद करत ब्रॉडने केली अँडरसन, अश्विनच्या विक्रमाची बरोबरी

You might also like
Loading...