---Advertisement---

रोहित शर्मा बनला ‘कॅच’ मास्टर; ब्रिस्बेन कसोटीत तब्बल ‘इतके’ झेल घेत केली दिग्गजाची बरोबरी

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 1:52 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर चौथा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१७ जानेवारी) चौथा दिवस आहे. या दविशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला असून भारताला ३२८ धावांचे आव्हान मिळाले आहे. यादरम्यान भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा याने सर्वाधिक झेल पकडत खास विक्रम आपल्या नावे केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सर्वप्रथम रोहितने मार्नस लॅब्यूशानेचा झेल पकडला. यामुळे मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर डावातील ३०.३ षटकापर्यंत भारताला तिसरी विकेट मिळाली. तर पुढे शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्याने कॅमरॉन ग्रीनचा झेल पकडला. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात रोहितने डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि कर्णधार टीम पेनचा झेल पकडला. अशाप्रकारे ब्रिस्बेन कसोटीत रोहितने एकूण ५ झेल पकडले आहेत.

यासह रोहित ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे एका सामन्यात सर्वाधिक झेल पकडण्याच्या विक्रमात माजी भारतीय दिग्गज के श्रीकांत यांची बरोबरी केली आहे. यापुर्वी १९९२ मध्ये श्रीकांत यांनी एका कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांचे झेल पकडले होते. तर माजी भारतीय क्रिकेटपटू शिवरामकृष्णन आणि विरेंद्र सेहवाग प्रत्येकी ४ झेलसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. शिवरामकृष्णन यांनी १९८५ मध्ये तर सेहवागने २००३ मध्ये हा पराक्रम केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live :सिराज-शार्दुलचा भेदक मारा; ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात, भारतासमोर ३२८ धावांचे आव्हान

भारतीय संघाला कमी लेखणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा ‘यू-टर्न’; आता करतोय तोंडभरुन कौतुक

ऑस्ट्रेलिया संघासाठी ३३ आकडा आहे अशुभ, जाणून घ्या काय आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---