बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 1-2ने गमावली. या मालिकेतील पहिले दोन सामने बांगलादेश संघाने आपल्या नावावर केले होते. यानंतर तिसरा वनडे सामना शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय साकारला. भारताने या सामन्यात बांगलादेश संघावर 227 धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, या विजयासह भारतीय संघाच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. विशेष म्हणजे, भारताच्या आसपासही इतर संघ नाहीयेत.
भारताचा विक्रम
या सामन्यात बांगलादेश (Bangladesh) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय (Team India) संघाने फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 409 धावा चोपल्या. यामध्ये ईशान किशन (210) आणि विराट कोहली (113) यांचा सिंहाचा वाटा होता. या दोघांच्याही शतकांच्या जोरावर भारताने वनडे क्रिकेटमधील 300 शतकांचा टप्पा पार केला. हा विक्रम करत भारत हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा अव्वल क्रमांकाचा संघ ठरला.
पहिल्या पाचमध्ये भारतीय संघ अव्वलस्थानी
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या बलाढ्य संघांमध्ये भारतीय संघ 300 शतकांसह अव्वलस्थानी आहे. यानंतर भारत आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या संघामध्ये तब्बल 60 शतकांचे अंतर आहे. ऑस्ट्रेलिया संघ 240 शतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर तिसऱ्या स्थानी पाकिस्तान संघ असून त्यांनी 214 शतके चोपली आहेत. 194 शतकांसह वेस्ट इंडिज संघ चौथ्या स्थानी आहे. या यादीत पाचव्या स्थानी दक्षिण आफ्रिका संघ आहे. त्यांनी वनडेत आतापर्यंत 191 शतके झळकावली आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे संघ
300 शतके- भारत*
240 शतके- ऑस्ट्रेलिया
214 शतके- पाकिस्तान
194 शतके- वेस्ट इंडिज
191 शतके- दक्षिण आफ्रिका
सामन्याचा आढावा
भारतीय संघाने या सामन्यात दिलेले 410 धावांचे आव्हान पार करण्यात बांगलादेश संघ अपयशी ठरला. त्यांना या सामन्यात 34 षटकात सर्व विकेट्स गमावत 182 धावाच करता आल्या. हा सामना गमावला असला, तरीही बांगलादेश संघाने ही मालिका 2-1ने आपल्या नावावर केली. (Most Centuries in ODI Indian cricket team topper in the list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशान किशन वर्षाला कमवतोय ‘एवढे’ कोटी, त्याबरोबर कोटींच्या गाड्या आहेत घरात
जे गेल अन् सेहवागलाही नाही जमलं, ते 24 वर्षांच्या किशनने करून दाखवलं; बातमी वाचाच