---Advertisement---

रोहित शर्माने वाढवले रिकी पाँटिंगचे टेंशन, जाणून घ्या कारण

On: सोमवार, जानेवारी 20, 2020 11:12 AM
---Advertisement---

बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडेत 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एक मोठा विक्रमही केला आहे.

रोहितने 128 चेंडूत 119 धावांची खेळी करताना 8 चौकार आणि 6 षटकार मारले. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 29 वे शतक आहे. त्यामुळे वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसुर्याला मागे टाकले आहे. जयसुर्याने वनडेमध्ये 28 शतके केली आहेत.

वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने 49 वनडे शतके केली आहेत.

त्याच्या पाठोपाठ या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटने 43 वनडे शतके केली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर 30 शतकांसह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग आहे. या यादीत रोहित आणि पाँटिंगमध्ये आता केवळ 1 शतकाचा फरक राहिला आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज – 

49 शतके – सचिन तेंडूलकर (463 सामने)

43 शतके – विराट कोहली (245 सामने)

30 शतके – रिकी पाँटिंग (375 सामने)

29 शतके – रोहित शर्मा (224 सामने)

28 शतके – सनथ जयसुर्या (445 सामने)

https://twitter.com/Maha_Sports/status/1219127287834001408

https://twitter.com/Maha_Sports/status/1218902945057538048

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---