बर्मिंघम येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार शुबमन गिलने शानदार शतक ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेलं. पहिल्या दिवसअखेर भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 310 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये गिल 114 तर रवींद्र जडेजा 41 धावांवर नाबाद आहेत.
या मालिकेतील शुबमन गिलचं हे सलग दुसरं शतक असून त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवं शतक ठरलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत गिल आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादीत रोहित शर्मा 9 शतकांसह आघाडीवर असून त्यांनी याच मालिकेपूर्वी रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे भारतीय फलंदाज:
रोहित शर्मा – 9
शुबमन गिल – 7
WTC इतिहासातील सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज:
जो रूट (इंग्लंड) – 18
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – 13
केन विल्यमसन (न्यूझीलंड) – 11
मार्नस लाबुशेन (ऑस्ट्रेलिया) – 11
रोहित शर्मा (भारत) – 9
डी सिल्वा (श्रीलंका) – 8
बाबर आझम (पाकिस्तान) – 8
उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) – 8
ट्रॅविस हेड (ऑस्ट्रेलिया) – 8
हॅरी ब्रूक (इंग्लंड) – 7
शुभमन गिल (भारत) – 7
बेन स्टोक्स (इंग्लंड) – 7
ओली पोप (इंग्लंड) – 7
रिषभ पंत (भारत) – 6
दुसऱ्या दिवसात भारताचं लक्ष्य किमान 500 धावा उभारण्याचं असेल. त्यासाठी शुबमन गिलला आपलं शतक द्विशतकामध्ये रूपांतर करावं लागेल, तर जडेजालाही मोठी खेळी करावी लागणार आहे.






