---Advertisement---

रोहित-कोहलीची जोडी हिट, केला हा मोठा पराक्रम

---Advertisement---

माऊंट मॉनगनुई| न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज तिसरा वऩडे सामना बे ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 243 धावा केल्या आहेत.

त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 244 धावांचे आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली होती. मात्र शिखर 28 धावांवर बाद झाला. त्यामुळे कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला.

कोहली आणि रोहितने डाव सावरताना भारताला भक्कम स्थितीत आणले. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. पण खेळपट्टीवर स्थिर झालेला रोहित शर्मा 62 धावांवर यष्टीचीत झाला. त्यामुळे ही भागीदारी तूटली.

परंतू तरीही या भागीदारीमुळे रोहित आणि कोहलीने एक खास विक्रम केला आहे. ही कोहली-रोहित या जोडीची वनडेमधील 16 वी शतकी भागीदारी होती.

वनडेमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांच्या यादीत कोहली-रोहितची जोडीने ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन या जोडीची बरोबरी केली आहे. त्यामुळे आता या यादीत  कोहली-रोहित आणि गिलख्रिस्ट-हेडन या जोड्या संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची जोडी असून त्यांनी 26 वेळा वनडेत शतकी भागीदारी केली आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर तिलत्करने दिलशान आणि कुमार संगकारा आहेत. त्यांनी 20 वेळा शतकी भागीदारी वनडेत केली आहे.

आजच्या सामन्यात रोहितने 77 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. तर कोहलीने 6 चौकार आणि 1 षटकारासह 74 चेंडूत 60 धावांची खेळी केली.

वनडेत सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या-

26 – सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली

20 – तिलत्करने दिलशान – कुमार संगकारा

16 – ऍडम गिलख्रिस्ट – मॅथ्यू हेडन

16 – रोहित शर्मा – विराट कोहली

15 – गोर्डन ग्रिनीज – देसमंड हाईन्स

15 – माहेला जयवर्धने – कुमार संगकारा

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्मा झाला ‘दस हजारी मनसबदार’

या कारणामुळे एमएस धोनीला बसावे लागले तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर

पुजारा, जॅक्सनच्या शानदार शतकी खेळीमुळे सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment