वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा केल्या.
या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा अधिक धावा करण्यात अपयश आले आहे. तो फक्त 2 धावा करुन गोलंदाज मॅट हेन्रीकडून त्रिफळाचीत झाला. मागच्या सामन्यातही त्याने सात धावाच केल्या होत्या.
रोहितने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून लागोपाठ 10 वन-डे मालिकेत किमान एक तरी शतक केले होते. पण आजच्या सामन्यात तो लवकर बाद झाला. त्यामुळे तसेच या न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला एकही शतक करता आले नाही.
यामुळे लागोपाठ वनडे मालिका किंवा स्पर्धांमध्ये किमान एकतरी शतक करण्याचा त्याचा क्रम 11व्या मालिकेत खंडीत झाला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या या 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत रोहितने 11, 87, 62, 7 आणि 2 अशा धावा केल्या आहेत.
रोहितने शेवटचे शतक मागील महिन्यात सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केले होते. यावेळी त्याने 133 धावा करत कारकिर्दीतील 22वे शतक झळकावले होते.
लागोपाठ वन-डे मालिकेत/ स्पर्धेत किमान एक तरी शतक करणारे खेळाडू-
10 मालिका – रोहित शर्मा (भारत)
6 मालिका – विराट कोहली (भारत)
5 मालिका – गॅरी कस्टर्न (दक्षिण आफ्रिका)
5 मालिका – सचिन तेंडुलकर (भारत)
5 मालिका – हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
महत्त्वाच्या बातम्या-
–१० वर्षानंतर हार्दिकने केली सचिनच्या त्या विक्रमाची बरोबरी
–९० धावा करुनही अंबाती रायडूच्या नावावर झाला नकोसा विक्रम
–या कारणामुळे भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलणार