क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, आणि त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाणेफेक. टॉस जिंकणे किंवा गमावणे हे पूर्णतः नशिबावर अवलंबून असते. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने एक अनपेक्षित विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक टॉस गमावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे नोंदला गेला आहे.
2023 ते 2025 या कालावधीत रोहित शर्माने सलग 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे. हा विक्रम क्रिकेटच्या इतिहासात दुर्मीळ मानला जातो. याआधी हा विक्रम वेस्ट इंडीजचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार ब्रायन लारा यांच्या नावावर होता. लाराने 1998 ते 1999 या काळात सलग 12 वेळा टॉस गमावला होता.
याच यादीत नेदरलँड्स संघाचा माजी कर्णधार पीटर बोरेन देखील आहे. बोरेनने 2011 ते 2013 या काळात सलग ११ वेळा टॉस गमावला होता. मात्र, रोहितने हा विक्रम गाठत लाराच्या बरोबरीने पहिले स्थान पटकावले आहे.
एकदिवसीय सामन्यात कर्णधाराने सर्वाधिक सलग टॉस गमावले
12- रोहित शर्मा (भारत, 2023-2025)*
12- ब्रायन लारा (वेस्ट इंडिज, 1998-1999)
11- पीटर बोरेन (नेदरलँड्स, 2011-2023)
भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 फायनल दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.





