एकीकडे संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम चालू आहे. तर दूसरीकडे न्यूझीलंड महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. तिथे दोन्ही संघात ३ ऑक्टोबरपासून ३ सामन्यांची वनडे मालिका चालू झाली आहे. आतापर्यंत या मालिकेतील २ सामने पार पडले आहेत. त्यातील दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघ हा महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात सलग २० सामने जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. २०१८ पासून हा संघ एकाही वनडे सामन्यात पराभूत झालेला नाही. यापुर्वी दोनदा ऑस्ट्रेलिया संघाने हा पराक्रम केला होता. १९९७-९९ दरम्यान त्यांनी सलग १७ वनडे सामने जिंकले होते. तर १९९९-२००० दरम्यान त्यांनी सलग १६ वनडे सामन्यात विजय मिळवला होता.
त्यांच्याव्यतिरिक्त भारतीय महिला संघानेही हा शानदार विक्रम केला होता. त्यांनी २०१६-१७ मध्ये सलग १६ वनडे सामन्यात विजयाची पताका झळकावली होती.
ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापुर्वीच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेची दणक्यात सुरुवात केली होती. तर ५ ऑक्टोबर रोजी झालेला दूसरा वनडे सामना ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्सने खिशात घातला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या टीमकडून द्रविड खेळला, त्याच टीमकडून द्रविडच्या लाडक्या शिष्याने केले पदार्पण
सुपर-डुपर गोलंदाज-यष्टीरक्षक जोडी! आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ अनोखा विक्रम, वाचा सविस्तर
भुवनेश्वर कुमारच्या जागी हैदराबाद संघात निवड झालेला कोण आहे पृथ्वी राज यारा, घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख-
असे ५ खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये सलामीला आणि ८ व्या क्रमांकावर केली आहे फलंदाजी
दुर्दैवी…! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद झालेले ३ फलंदाज; विराटचाही आहे समावेश