---Advertisement---

टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात ‘या’ रेकॉर्डचा किंग जसप्रीत बुमराह! आर अश्विनला टाकले मागे

On: शुक्रवार, फेब्रुवारी 13, 2026 4:49 PM
---Advertisement---

भारताने सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६चा सलग दुसरा विजय मिळवला. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) भारताने नामिबियाविरुद्ध ९३ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ विकेट्स गमावत २०९ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात नामिबिया १८.२ षटकात ११६ धावांवर सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराहने यावेळी एक विकेट मिळवली असली तरी त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

बुमराहने ४ षटकात केवळ २० धावा देत एक विकेट घेतली. या त्याच्या स्पेलमध्ये त्याने ११ डॉट-बॉल (निर्धाव चेंडू) टाकले आणि टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा भारतीय गोलंदाज ठरला. याआधी हा विक्रम माजी फिरकीपटू आर अश्विनच्या नावावर होता. त्याने २३५ डॉट बॉल टाकले असून बुमराहचे २३७ डॉट बॉल झाले आहेत. या यादीत रविंद्र जडेजा २१८ डॉट बॉल तिसऱ्या स्थानावर आहे. हार्दिक १७५ डॉट बॉलसह चौथ्या आणि अर्शदीप सिंग १६८ डॉट बॉल पाचव्या स्थानावर आहे.

तसेच टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. आता तोही धोक्यात आला आहे. अश्विनने ३३ विकेट्स घेतले असून अर्शदीपचे १६ सामन्यात ३० विकेट्स झाल्या आहेत. तो भारतासाठी २०२२ आणि २०२४ टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

नामिबियाविरुद्ध भारताच्या अन्य गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक अशा तीन विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ तसेच अर्शदीप, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

या सामन्यात भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली होती. त्यामध्ये ईशान किशन आणि हार्दिकने अर्धशतकी खेळी केल्या होत्या. ईशानने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली होती. ईशानने २४ चेंडूत ६१ धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने शिवम दुबेसोबत पाचव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. हार्दिकने २८ चेंडूत ५२ धावा केल्या.

नामिबियाकडून सर्वाधिक धावा जेन फ्राइलिंकने २२ धावा आणि लॉरेन स्टीनकॅम्पने २९ धावा यांनी केल्या. बाकीचे फलंदाज २० पेक्षा अधिक धावाही करू शकले नाही. भारताने हा सामना ९३ धावांनी जिंकला.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---