---Advertisement---

कसोटीमध्ये द्विशतक झळकावणारे भारतीय खेळाडू; यातील एकाने केलाय ‘हा’ मोठ्ठा विक्रम

On: शुक्रवार, मे 22, 2020 1:15 PM
---Advertisement---

भारताकडून कसोटी सामने खेळलेल्या आणि खेळत असलेल्या अनेक फलंदाजांनी, आजपर्यंत आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांची धुलाई करत अनेक शतके आणि द्विशतकांना गवसणी घातली आहे.

“भारतीय संघाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना 1932 मध्ये खेळला होता. भारताने तो पहिला ऐतिहासिक कसोटी सामना इंग्लंड संघाविरुद्ध ‘लॉर्डस्’ या मैदानावर खेळला होता.”

1932 सालापासून ते आजपावेतो भारताकडून तब्बल 296 खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यातील अनेक खेळाडूंनी प्रदीर्घ कालावधीपर्यंत कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताच्या या 296 खेळाडूंमध्ये 33 खेळाडूंनी भारताच्या कसोटी संघाचे यशस्वीपणे नेतृत्व केलेले आहे.

“भारताला पहिला ऐतिहासिक कसोटी सामना जिंकून देणारा कर्णधार लाला अमरनाथ हा होता. लाला अमरनाथ याने 1952 मध्ये भारताला पहिल्यांदा कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला होता. लाला अमरनाथने आपला कसोटी पदार्पण सामना 1933 मध्ये खेळला होता. ज्यात त्याने 118 धावांची तडाखेबाज विक्रम खेळी केली होता.”

कसोटी सामन्यात नेहमीच फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगल्या जातात. याचे कारण पाच दिवस, दोन डाव आणि अमर्यादीत षटके, यामुळे फलंदाजांनी संघासाठी धावांचा डोंगर उभारणे अपेक्षित असते. अशावेळी एखाद्या सामन्यात शतक साकारणाऱ्या खेळाडूकडून पुढे द्विशतकाची देखील अपेक्षा बाळगली जाते.

भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये द्विशतकांची खेळी ;

भारताकडून आजपर्यंत 24 खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत कसोटीत द्विशतकांना गवसणी घातलेली आहे. “पॉली उमरीगर हा भारताकडून कसोटीत द्विशतक साकारणार पहिला खेळाडू आहे. तर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा कसोटीत सर्वाधिक द्विशतके साकारणारा भारतीय खेळाडू आहे.”

भारताकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक द्विशतके साकारणाऱ्या खेळाडूंची यादी;

1 – विराट कोहली (7 द्विशतके) – सर्वाधिक धावा 254* विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऑक्टोबर 2019

2 – विरेंद्र सेहवाग (6 द्विशतके) – सर्वाधिक धावा 319 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मार्च 2008

“विरेंद्र सेहवागने आपल्या 6 द्विशतकांमध्ये दोन वेळा आपल्या द्विशतकाचे रुपांतर त्रिशतकात केले आहे. असा विक्रम करणार विरेंद्र सेहवाग हा सध्या एकमेव भारतीय खेळाडू आहे”

3 – सचिन तेंडुलकर (6 द्विशतके)- सर्वाधिक धावा 248* विरुद्ध बांगलादेश, डिसेंबर 2004

4 – राहुल द्रविड (5 द्विशतके) – सर्वाधिक धावा 270 विरुद्ध पाकिस्तान, एप्रिल 2004

5 – सुनिल गावसकर (4 द्विशतके) – सर्वाधिक धावा 236* विरुद्ध वेस्ट इंडीज, डिसेंबर 1983

6 – चेतेश्वर पुजारा (3 द्विशतके) – सर्वाधिक धावा 206* विरुद्ध इंग्लंड, नोव्हेंबर 2012

7 – मयांक अग्रवाल (2 द्विशतके) – सर्वाधिक धावा 243 विरुद्ध बांगलादेश, नोव्हेंबर 2019

8 – विनोद कांबळी (2 द्विशतके) – सर्वाधिक धावा 227 विरुद्ध झिम्बाम्ब्वे, मार्च 1993

9 – दिलीप सरदेसाई (2 द्विशतके) – सर्वाधिक धावा 212 विरुद्ध वेस्ट इंडीज, फेब्रुवारी 1971

10 – वासिम जाफर (2 द्विशतके) – सर्वाधिक धावा 212 विरुद्ध वेस्ट इंडीज, जुन 2006

11 – विनू मंकड (2 द्विशतके) – सर्वाधिक धावा 231 विरुद्ध न्युजीलंड, जानेवारी 1956

12 – वि.वि.एस लक्ष्मण (2 द्विशतके) – सर्वाधिक धावा 281 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मार्च 2001

13 – करुण नायर (1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 303* विरुद्ध इंग्लंड, डिसेंबर 2016

“विरेंद्र सेहवागनंतर भारताकडून कसोटीत त्रिशतक साकारणारा करुण नायर हा एकमेव खेळाडू आहे”

14 – रोहित शर्मा (1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 212 विरुद्ध दक्षिण आफ्रीका, ऑक्टोबर 2019

15 – संजय मांजरेकर (1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 218 विरुद्ध पाकिस्तान, डिसेंबर 1989

16 – अंशुमन गायकवाड (1 द्विशतक)- 201 विरुद्ध पाकिस्तान, सप्टेंबर 1983

17 – नवज्योत सिंह सिद्धू (1 द्विशतक)- सर्वाधिक धावा 201 विरुद्ध वेस्ट इंडीज, मार्च 197

18 – मंसूर अली खान पतौडी (1 द्विशतक)- सर्वाधिक धावा 203* विरुद्ध इंग्लंड, फेब्रुवारी 1964

19 – पॉली उमरीगर (1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 223 विरुद्ध न्युझीलंड, नोव्हेंबर 1955

“पॉली उमरीगर हा भारताकडून कसोटीत द्विशतक साकारणार पहिला खेळाडू आहे.”

20 – गौतम गंभीर ( 1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 206 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑक्टोबर 2008

21 – रवी शास्त्री (1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 206 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जानेवारी 1992

22 – महेंद्र सिंग धोनी (1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 224 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, फेब्रुवारी 2013

23 – गुंडप्पा विश्वनाथ ( 1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 222 विरुद्ध इंग्लंड, जानेवारी 1982

24 – सौरव गांगुली (1 द्विशतक) – सर्वाधिक धावा 239 विरुद्ध पाकिस्तान, डिसेंबर 2007

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---