पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे आज(18 डिसेंबर) दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजय पहिल्या डावात तर केएल राहुल दुसऱ्या डावात शून्य धावेवर बाद झाले. 2018 या वर्षात शून्यावर बाद होण्याची राहुलची 4 थी आणि विजय 3री वेळ होती.
त्यामुळे या वर्षात भारतीय सलामीवीर कसोटीमध्ये मिळून तब्बल 7 वेळा शून्य धावेवर बाद होण्याचा विक्रम झाला आहे. एका वर्षात एकूण 7 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा शून्य धावेवर भारतीय सलामीवीर बाद होण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे.
याआधी 2002 मध्ये भारतीय सलामीवीर एकूण 8 वेळा शून्य धावेवर बाद झाले होते. तसेच 2010 मध्येही भारतीय सलामीवीर एकूण 7 वेळा शून्य धावेवर बाद झाले होते.
त्याचबरोबर एका वर्षात वैयक्तिक सर्वाधिक वेळा शून्य धावेवर बाद होणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी फक्त पंकज रॉय हे 1952 मध्ये 5 वेळा सलामीला फलंदाजी करताना शून्य धावेवर बाद झाले होते.
एका वर्षात एकूण सर्वाधिक वेळा भारतीय सलामीवीर शून्य धावेवर बाद होण्याची वेळ –
8 वेळा – 2002
7 वेळा – 2018*
7 वेळा – 2010
6 वेळा – 1983
6 वेळा – 1952
एका वर्षात वैयक्तिक सर्वाधिक वेळा शून्य धावेवर बाद होणारे भारतीय सलामीवीर फलंदाज-
5 – पंकज रॉय (1952)
4 – केएल राहुल (2018)
3 – पंकज रॉय (1955, 1959)
3 – सुनील गावसकर (1983)
3 – नवज्योत सिंग सिद्धू (1989)
3 – विरेंद्र सेहवाग (2006)
3 – वासिम जाफर (2007)
3 – गौतम गंभीर (2010)
3 – मुरली विजय (2018)
महत्त्वाच्या बातम्या:
–पर्थ कसोटी: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने केली मालिकेत बरोबरी
–केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान
–जाणून घ्या २०१९च्या आयपीएलसाठी कोणते संघ किती परदेशी खेळाडू खरेदी करु शकतात