कोलकाता। आज(19 डिसेंबर) आयपीएल 2020 साठी लिलाव सुरु आहे. या लिलावात भारताचा गोलंदाज पियुष चावलाला चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले असून त्याच्यासाठी त्यांनी तब्बल 6 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली आहे.
त्यामुळे तो या लिलावातील सर्वात महागडा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
चावला आयपीएलमधील अनुभवी खेळाडू असून त्याने आत्तापर्यंत 157 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 584 धावा केल्या आहेत आणि 150 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याच्यापाठोपाठ मागीलवर्षी सर्वात महागडा ठरलेल्या वरुण चक्रवर्तीला 4 कोटींची बोली लागली आहे. तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने संघात घेतले आहे.
तसेच रॉबिन उथप्पा आणि जयदेव उनाडकटला प्रत्येकी 3 कोटींची बोली लागली असून त्यांना राजस्थान रॉयल्सने खरेदी केले आहे. ते तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे भारतीय खेळाडू ठरले आहेत.
आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप ८ खेळाडू https://t.co/um610ckWmb#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
तिसऱ्या वनडे सामन्यात दीपक चाहरच्या जागी खेळणार हा खेळाडू…
वाचा- 👉https://t.co/WSjdthNoUh👈#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019