आयपीएल २०२१ स्पर्धेच्या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले होते. गेल्या १४ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले होते. जेव्हा ४ खेळाडूंवर १४ कोटींपेक्षा अधिक बोली लावण्यात आली होती. फ्रेंचायजींनी या खेळाडूंवर विश्वास दाखवून आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु यामध्ये काही खेळाडू आहेत,जे रातोरात कोट्याधीश झाले परंतु मैदानात साजेशी कामगिरी करण्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. चला तर जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल सविस्तर.
१) कायले जेमिसन :
न्यूझीलंड संघाचा उंचकाठीचा अष्टपैलू खेळाडू कायले जेमिसन हा आयपीएल २०२१ स्पर्धेतील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवणारा जेमिसन आयपीएल स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला अवघे ९ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच फलंदाजी करताना त्याला अवघ्या ६५ धावा करण्यात यश आले होते. ही कामगिरी पाहता त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान मिळवणे ही कठीण झाले आहे.
२)ख्रिस मॉरिस :
दक्षिण आफ्रिका संघाचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस हा आयपीएल २०२१ स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला १६.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. भारतात जेव्हा आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला. त्यावेळी ख्रिस मॉरिसने ७ सामन्यात १४ गडी बाद करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. परंतु, यूएईमध्ये झालेल्या तीन सामन्यात त्याला एकच गडी बाद करण्यात यश आले आहे.
३) ओएन मॉर्गन :
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन देखील आयपीएल २०२१ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आयपीएल २०२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दिनेश कार्तिकला कर्णधार पदावरून काढून ओएन मॉर्गनला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत ११ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १०७ धावा करण्यात यश आले आहे.