भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या अहमदाबाद कसोटी सामन्यात ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी केली, त्याचप्रमाणे भारतीय गोलंदाजही चमकले. त्यातील आर अश्विन या अनुभवी फिरकीपटूने खास विक्रम नावावर केला. अशी कामगिरी करणारा अश्विन हा भारतातीलच नव्हे, तर जगातला दुसरा खेळाडू बनला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या तीन कसोटीत संघर्ष करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत नांगर टाकून फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 480 धावांचा डोंगर उभारला. यातील सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा आर अश्विन (R Ashwin) याने केला. त्याने यादरम्यान 47.2 षटके गोलंदाजी करताना 91 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या आहेत.
आर अश्विनचा विक्रम
अश्विनने 165व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर टॉड मर्फी (Todd Murphy) याची विकेट काढली. मर्फी यावेळी 41 धावांवर तंबूत परतला. मर्फी अश्विनची पाचवी विकेट ठरला. ही विकेट काढताच अश्विनने इतिहास रचला. अश्विन हा मायदेशात खेळताना सर्वाधिक वेळा विकेट्सचे पंचक पूर्ण करणारा जगातील दुसरा गोलंदाज बनला. त्याने आतापर्यंत 26 वेळा हा कारनामा केला आहे.
This has been yet another marvellous bowling performance from the senior spinner @ashwinravi99 💪💪
This is his 26th 5-wicket haul in India, the most by any bowler! 🙌🏽🫡#INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/hH3ySuOsEY
— BCCI (@BCCI) March 10, 2023
मायदेशात सर्वाधिक वेळा विकेट्सचे पंचक पूर्ण करणारा अव्वल गोलंदाज श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आहे. त्याने 45वेळा विकेट्सचे पंचक पूर्ण केले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या अश्विनसोबत श्रीलंकेचा दुसरा दिग्गज रंगना हेरथ आहे. त्यानेही 26वेळा ही कामगिरी केली आहे. यादीत तिसऱ्या स्थानी भारतीय दिग्गज अनिल कुंबळे (Anil Kumble) असून त्याने 25 वेळा, तर इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन याने 24 वेळा ही कामगिरी केली आहे. (Most five-wicket hauls at home Overall)
मायदेशात सर्वाधिक वेळा विकेट्सचे पंचक घेणारे खेळाडू
45 वेळा- मुथय्या मुरलीधरन
26 वेळा- आर अश्विन*
26 वेळा- रंगना हेरथ
25 वेळा- अनिल कुंबळे
24 वेळा- जेम्स अँडरसन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ख्वाजा-ग्रीनने रचला इतिहास! बनली भारतात ‘हा’ कारनामा करणारी ऑस्ट्रेलियाची तिसरीच जोडी
शतक ठोकल्यानंतर हरमनप्रीतवर आलेलं भयंकर संकट, थेट आई-वडिलांना येत होते कॉल्स; वाचा काय घडलेलं