---Advertisement---

भारताने मिळवली एशियन गेम्सच्या इतिहासातील सर्वाधिक पदके

On: शनिवार, सप्टेंबर 1, 2018 3:43 PM
---Advertisement---

जकार्ता | येथे सुरु असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताने एकूण ६८ पदके जिंकली आहेत. यामुळे भारत या पदकतालिकेत ८व्या स्थानावर आहेत.

१५ सुवर्ण, २४ रौप्य आणि २९ कांस्यपदकांसह भारताने ६८ पदके जिंकली आहेत. एशियन गेम्सच्या इतिहासात एका स्पर्धेत भारताने प्रथमच एवढी पदके जिंकली आहेत.

यापुर्वी २०१०मध्ये गुआनझोउला भारताने ६५ पदके जिंकली होती. तर दिल्ली एशियन गेम्समध्ये १९८२ला ५८ पदके जिंकली होती.

तसेच या स्पर्धेत भारताने १५ सुवर्णपदकं जिंकत १९५१च्या नवी दिल्लीत झालेल्या एशियन गेम्समधील सुवर्णपदकांची बरोबरी केली आहे.

या स्पर्धेचा समारोप २ सप्टेंबर रोजी होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वॉचमनच्या मुलाची झाली आशिया कपसाठी टीम इंडियात निवड

 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद

 बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

 याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

 वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment