इंडिनय प्रीमियर लीग 2023 शुबमन गिल साठी खऱ्या अर्थाने खास ठरला. गिने यावर्षी आयपीएलमध्ये 3 शतके केली. शुक्रवारी (26 मे) गिने आयपीएल हंगामातील आपले तिसरे शतक ठोकले आणि एका खास यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला. गिल एका आयपीएल हंगामात सर्वादिक शतके करणारा तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक शतकांचा विक्रम आजही भारतीय दिग्गज विरट कोहली (Virat Kohli) याच्याच नावावर आहे. विराटने आयपीएल 2016 मध्ये एकूण 4 शतके करायची आहेत. विराटने या हंगामात सर्वाधिक 973 केल्या होत्या. विराटने या हंगामात केलेल्या शतकांचा आणि धावांचा विक्रम अद्याप कोणताच फलंदाज मोडू शकला नाहीये. सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसरा क्रमांक जोस बटलर (Jos Buttler) याचा आहे. इंग्लंडच्या या फलंदाजाने आयपएल 2022 मध्ये चार शतके करत विराट कोहलीची बरोबरी केली होती. मात्र, धावांच्या बाबतीत बटलर विराटच्या मागेच होता. बटलरने मागच्या वर्षी आयपीएलमध्ये 863 धावा केल्या होत्या.
शुबमन गिल (Shubman Gill) आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलने 16 सामन्यांमध्ये आतापर्यंत तीन शतके ठोकली असून 851 धावा केल्या. शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना त्याने 60 चेंडूत 129 धावा कुटल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 10 षटकार पाहायला मिळाले. 215.00च्या स्ट्राईक रेटने गिलने या धावा केल्या. गुजरात टायटन्स जर मुंबई इंडियन्सला पराभूत करून अंतिम सामन्यात पोहोचली, तर शुबमन गिलकडे जोस बटलरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी असेल.
आयपीएल हंगामात सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
4 – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, 2016)
4 – जोस बटलर (राजस्थान रॉयल्स, 2022)
3 – शुबमन गिल (गुजरात टायटन्स, 2023)
आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – 973 (2016)
जोस बटलर – 863 (2022)
शुबमन गिल – 851 (2023)*
(Most hundreds in an IPL season / Most runs in an IPL season)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023चा ऑरेज कॅप होल्डर बनला शुबमन गिल! आरसीबी कर्णधार पडला मागे
आयपीएल क्लोजिंग सेरेमनी । रॅपर किंग-डिवाइनसह हे मोठे कलाकार लावणार हजेरी