रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. हा महत्त्वाचा सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली. या विजयासह इंग्लंड संघाच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंड संघ सर्वाधिक आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकणारा चौथ्या क्रमांकाचा संघ ठरला आहे.
पाकिस्तानवर दमदार विजय
इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, पाकिस्तान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पाकिस्तानने यावेळी निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावा केल्या. त्यांच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या फलंदाजांनी हे आव्हान 5 विकेट्स गमावत 19 षटकात पूर्ण केले आणि पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला.
CHAMPIONS 🏴 🎉#T20WorldCup pic.twitter.com/wDgM42SySX
— ICC (@ICC) November 13, 2022
इंग्लंडच्या नावावर आयसीसीच्या 3 ट्रॉफी
या विजयासह इंग्लंड संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा विजेता ठरला. टी20 विश्वचषक उंचावण्याची ही इंग्लंडची दुसरी वेळ होती. यापूर्वी इंग्लंडने 2010 साली पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वात टी20 विश्वचषक जिंकला होता. 2022च्या या ट्रॉफीसह इंग्लंड आयसीसीच्या सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा संघ ठरला. इंग्लंडने आतापर्यंत आयसीसीच्या 3 ट्रॉफी जिंकल्या आहेत. यामध्ये 2019 सालच्या पुरुष विश्वचषकाचाही समावेश आहे.
आयसीसीच्या सर्वाधिक ट्रॉफी आपल्या नावावर करणाऱ्या संघांच्या यादीत अव्वलस्थानी ऑस्ट्रेलिया संघ आहे. त्यांनी आयसीसीच्या 8 ट्रॉफी जिंकल्या आहेत. संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी भारत आणि वेस्ट इंडिज असून त्यांनी प्रत्येकी 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. या यादीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी इंग्लंडसह पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आहे. यांनी प्रत्येकी 3 ट्रॉफी जिंकल्या आहेत. यानंतर न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानी असून त्यांनी 2, तर पाचव्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने आयसीसीची 1 ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. (Most ICC trophies winning teams)
सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणारे संघ
8 वेळा- ऑस्ट्रेलिया
5 वेळा- भारत
5 वेळा- वेस्ट इंडिज
3 वेळा- इंग्लंड*
3 वेळा- पाकिस्तान
3 वेळा- श्रीलंका
2 वेळा- न्यूझीलंड
1 वेळा- दक्षिण आफ्रिका
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतापर्यंत ‘या’ संघांनी उंचावलीय टी20 वर्ल्डकपची ट्रॉफी, विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर
नवे जगज्जेते! पाकिस्तानला नमवत इंग्लंडच्या शिरावर टी20 विश्वविजयाचा ताज; स्टोक्स पुन्हा हिरो