पाकिस्तान क्रिकेट संघ रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. अंतिम सामन्यात पाकिस्तानपुढे इंग्लंडचे आव्हान होते, जे त्यांना पेलता आले नाही. इंग्लंडने हा सामना पाच विकेट्स आणि एक षटक राखून जिंकले. पाकिस्तान संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हा पराभव म्हणजे मोठा निराशेचा विषय आहे. पाकिस्तानचा माजी दिग्गज शोएब अख्तर यानेही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. पण पाकिस्तानसोबत घडलेला हा प्रकार त्यांच्या कर्मांचे फळ आहे, असे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला वाटते.
पाकिस्तान संघ टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) च्या उपांत्य फेरीत पोहोचेल, याच्या आशा पूर्णपणे मावळल्या होत्या. पण ग्रुप दोनमध्ये शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँड्सकडून पराभूत झाला आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. पाकिस्तानने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभूत करून अंतिम सामन्यात जागा पक्की केली, तर इंग्लंडने भारताचा पराभव करून अंतिम सामन्यात धडक दिली. पाकिस्तान कसाबसा अंतिम सामन्यात पोहोचला, पण रविवारी (13 नोव्हेबंर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) त्यांना इंग्लंडने पराभवाची धूळ चारली. हा सामना इंग्लंडने 5 विकेट्स राखून जिंकला असून दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2010 मध्ये खेळला गेलेला टी-20 विश्वचषक इंग्लंडनेच जिंकला होता.
Sorry brother
It’s call karma 💔💔💔 https://t.co/DpaIliRYkd
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 13, 2022
पराभवानंतर इंग्लंड संघ आणि चाहते नाराज आहेत. त्यांचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अशात अंतिम सामन्यात मिळालेला पाराभव देखील अख्तरच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. अख्तरने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून तुटलेले ह्रदय पोस्ट केले आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर इतरही देशांतील आजी-माजी खेळाडू त्यांच्या चांगल्या प्रदर्शनाचे कौतुक करताना दिसत आहे. पण मोहम्मद शमी (Mohammad Shami) मात्र एका वेगळ्याचे अंदाजात दिसला. त्याने अख्तरच्या ट्वीटला रिट्वीट करत लिहिले की, “माफ कर भाऊ, पण यालाच कर्म असे म्हणतात.” दरम्यान शमीची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अनेकजण यावर वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये संघांच्या हालचालींना वेग; ‘या’ खेळाडूंची संघाकडून अदलाबदली
आतापर्यंत ‘या’ संघांनी उंचावलीय टी20 वर्ल्डकपची ट्रॉफी, विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर