हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही तीन सामन्यांची टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. यामुळे आजचा सामना जिंकून मालिका २-१ अशी खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.
आज जेव्हा नाणेफेक झाली तेव्हाच धोनीच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३०० सामने खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
तसेच याच सामन्यात धोनीने दुसराही एक पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने तब्बल ५९४व्या डावात यष्टीरक्षण करण्याचा पराक्रम केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. धोनीने कारकिर्दीत ५२४ सामन्यांत ही कामगिरी केली आहे.
याबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावात यष्टीरक्षण करण्याची संधी मार्क बाऊचरला मिळाली होती. त्याने तब्बल ५९६ सामन्यात हा पराक्रम केला आहे. यामुळे जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येईल तेव्हा धोनीला हा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे.
सर्वाधिक डावात यष्टीरक्षण करणारे यष्टीरक्षक-
५९६- मार्क बाऊचर
५९४- एमएस धोनी
४९९- कुमार संगकारा
४८५- अॅडम गिलख्रीस्ट
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी जादू! हातात बॅटही न घेतलेल्या धोनीच्या नावावर तिसऱ्या टी२० सामन्यात विक्रमांचा विक्रम