जेव्हा कोणताही खेळाडू फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करतो, तर त्याचं स्वप्न असते की त्यानेही शतक ठोकावे. जेव्हा फलंदाज शतक ठोकतो, तेव्हा त्याच्या संघाला एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मदत होते. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये टी-20 पेक्षा जास्त शतक करण्याची संधी असते. कारण या प्रकारात भरपूर चेंडू असतात. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये एका डावात फलंदाजीसाठी 120 चेंडू मिळतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करणे ही सोपी बाब नसते. भारतीय क्रिकेट इतिहासात कित्येक जबरदस्त गोलंदाज राहिले, अशात भारताविरुद्ध मोठी खेळी खेळणे फलंदाजांसाठी सोपी गोष्ट नसते. तसं पाहिले, तर भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत आंतरराष्ट्रीय शतक ठोकणार्या खेळाडूंची यादी खूप मोठी आहे.
परंतु आज आपण लेखातून भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक जास्त शतके करणाऱ्या तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
3. सर विवियन रिचर्ड्स (11)
वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज खेळाडू सर विवियन रिचर्ड्स यांना क्रिकेट विश्वात त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या इतिहासात त्यांना असा फलंदाज म्हणून ओळखले जाते की, जे कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजी आक्रमणाला आपल्या फलंदाजीसमोर निष्फळ करत होते. रिचर्ड्स यांनी भारतीय संघाविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी अनेक दमदार खेळी केल्या आहेत.
विवियन रिचर्ड्स यांनी भारताविरुद्ध एकूण 59 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 28 कसोटी आणि 31वनडे सामने समावेश आहे. रिचर्ड्स यांच्या नावावर कसोटीत भारताविरुद्ध 8 आणि वनडेत 3 शतकांची नोंद आहे. त्यामुळे यांच्या नावावर भारताविरुद्ध 11 शतकांचा विक्रम आहे.
2. स्टीव्ह स्मिथ (12)
मागील काही वर्षामध्ये ज्या एका खेळाडूने भारतीय संघाला सतत धावा काढून त्रास दिला आहे, तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची फिरकीपटू म्हणून सुरुवात करणारा स्मिथ हा फलंदाज म्हणून इतका यशस्वी होईल याची कल्पना कोणीच केली नसेल. या खेळाडूने आपल्या अनोख्या अंदाजात फलंदाजी करताना जगातील बर्याच संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्याने भारताविरुद्ध दमदार प्रदर्शन केले.
त्याने भारताविरुद्ध एकूण 33 सामने खेळताना 12 शतके ठोकली आहेत. यामध्ये 7 कसोटीत आणि 5 वनडेत शतके साकारलीत. स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध 71 पेक्षा जास्त सरासरीने धावा काढल्यात.
1. रिकी पाँटिंग (14)
ऑस्ट्रेलियाचा सर्वात जास्त यशस्वी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग भारताविरुद्ध सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय शतके करण्याच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. या दिग्गजाने भारताविरुद्ध एकूण 89 आंतराष्ट्रीय सामने खेळलेत आणि 14 शतके ठोकली आहेत.
यामध्ये त्याने कसोटीत 8 आणि वनडेत 6 शतके केलीत. पाँटिंगची सर्वाधिक धावसंख्या 257 आहे. त्यांच्या देशातील स्टीव्ह स्मिथला हा विक्रम भारताविरुध्दच्या दौऱ्यात आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
ट्रेंडिंग लेख-
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत
वनडेत सर्वाधिक महागडे ठरलेले ३ भारतीय स्पिनर; अव्वल क्रमांक ‘आश्चर्यकारक’
महत्त्वाच्या बातम्या-
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”