---Advertisement---

शतक एक विक्रम अनेक! रोहित बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा पाचवा सक्रिय खेळाडू

On: मंगळवार, जानेवारी 24, 2023 4:49 PM
Rohit-Sharma-Record
---Advertisement---

भारतीय संघाने न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्यासाठी तिसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. या सामन्यात भारताने एकही विकेट न गमावता 200 धावांचा आकडा पार केला होता. या धावांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने शतकी खेळी करत सिंहाचा वाटा उचलला. यासह रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले. त्यातील एक खास विक्रम आपण जाणून घेऊया. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला.

रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक गमावली. न्यूझीलंडने यावेळी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून सलामीला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) फलंदाजीसाठी उतरले होते. यावेळी रोहितने जबरदस्त फलंदाजी करत 84 चेंडूत शतक पूर्ण केले. हे शतक करताना रोहितने 6 षटकार आणि 9 चौकार मारले. यासह रोहितने वनडे कारकीर्दीतील 30वे शतक साकारले. तसेच, हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42वे शतक ठरले. यासह रोहितच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

https://twitter.com/BCCI/status/1617821609926209536

रोहित शर्माचा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी विराजमान झाला. या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आतापर्यंत 74 शतके झळकावली आहेत. त्याच्यानंतर 45 आंतरराष्ट्रीय शतकांसह डेविड वॉर्नर (David Warner) हा दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, तिसऱ्या स्थानी जो रूट आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आतापर्यंत 44 शतके झळकावली आहेत. या यादीत संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी रोहित आणि स्टीव्ह स्मिथ  (Steve Smith) आहेत. दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 शतके झळकावली आहेत.

रोहित आणि गिलमध्ये द्विशतकी भागीदारी
रोहित आणि गिल यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 212 धावांची भागीदारी रचली. ही भारतासाठी वनडेतील पाचवी मोठी भागीदारी ठरली. या धावांमध्ये रोहितने 101 धावांचे आणि गिलने 103 धावांचे योगदान दिले होते. (Most International hundreds among active players rohit sharma)

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारे खेळाडू
74 शतके- विराट कोहली
45 शतके- डेविड वॉर्नर
44 शतके- जो रूट
42 शतके- स्टीव्ह स्मिथ
42 शतके- रोहित शर्मा*

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
इंदोरमध्ये घोंघावले ‘हिटमॅन’ वादळ! तब्बल 1100 दिवसांनी रोहितचे वनडे शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---