मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्याला इंदोर येथे सुरुवात झाली. पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातलेल्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शुबमन गिल व कर्णधार रोहित शर्मा यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढत वैयक्तिक शतके पूर्ण केली. रोहितचे हे 30 वे वनडे शतक ठरले.
𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗬! 🔥
Talk about leading from the front! 🙌🏻
A magnificent century from #TeamIndia captain @ImRo45 💯
Follow the match ▶️ https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/iR3IJH3TdB
— BCCI (@BCCI) January 24, 2023
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय संघाला उत्कृष्ट सुरूवात देत असलेल्या रोहितला अर्धशतकाचे रूपांतर शतकात करण्यात अपयश येत होते. मात्र, होळकर स्टेडियमवर त्याने ती कसर देखील भरून काढली. फलंदाजांना पोषक असलेल्या या खेळपट्टीवर त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. शुबमन गिलसह त्याने 25 षटकात संघाला 200 पार नेले.
रोहितने आपले शेवटचे शतक 1100 दिवसांपूर्वी झळकावले होते. मात्र, या सामन्यात त्याने अखेर तो टप्पा पार केला. त्याने आपले शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 83 चेंडू घेतले. यामध्ये 9 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. शतकानंतर मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. 85 चेंडूवर 101 धावांवर तो माघारी परतला.
या शतकासह रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आला. सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके झळकावली आहेत. या यादीमध्ये भारतातच विराट कोहली 46 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग हा असून, त्याच्या नावे देखील 30 वनडे शतके जमा आहेत.
(Rohit Sharma Hits ODI century after 1100 days Against Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेसाठी मैदानात उतरताच रोहित-विराटचा खास विक्रम, अझरुद्दीन अन् गांगुलीलाही पछाडले
तिसऱ्या वनडेत नाणेफेकीचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने, भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल