भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळले. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तीनही प्रकारात काही क्रिकेटपटू देशाकडून खेळले.
स्वातंत्र्याच्या या ७० वर्षात अर्थात १५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०१७ या काळात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी अनेक विक्रम केले.
आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय खेळाडू
#१ सचिन तेंडुलकर
शतके-१०० सामने- ६६४
#२ राहुल द्रविड
शतके- ४८ सामने- ५०९
#३ विराट कोहली
शतके-४५ सामने- २९४
#४ वीरेंद्र सेहवाग
शतके-३८ सामने- ३६३
#५ सौरव गांगुली
शतके-३८ सामने- ४२४
(सर्व आकडेवारी ही १५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०१७ या काळातील कसोटी, एकदिवसीय सामने आणि आंतराराष्ट्रीय टी२० सामने मिळून आहे. )