भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. रविवारी या सामन्याचा तिसरा दिवस होता. भारतीय संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाचा डाव लवकर गुंडाळल्याने भारतीय फलंदाजांनी तीनही दिवस फलंदाजी केली. यात पहिला, दुसरा आणि तिसराही दिवस गाजवला ते भारताच्या दोन युवा फलंदाजांनी. पहिला म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि दुसरा म्हणजे शुबमन गिल. जस्वालने पहिल्या डावात शानदार द्विशतक झळकावले. परंतू दुसऱ्या डावात तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे पहिल्या डावात 34 धावांची खेळी करणाऱ्या युवा शुबमन गिलने दुसऱ्या डावात मात्र शानदार शतक झळकावले. मागील अनेक दिवसांपासून धावांचा शोध घेणाऱ्या गिलला या कसोटीत मात्र सुर गवसला आणि त्याने शतकी खेळी केली. ह्या खेळीसह शुबमनने अनेक रेकॉर्डही (Shubman Gill Record) केलेत.
रविवारी झळकवलेल्या शतकासह शुबमन गिलने एका खास रेकॉर्डच्या क्लबमध्ये एन्ट्र्री केली आहे. विशेष म्हणजे या क्लबमध्ये भारताचे फक्त दोन महान खेळाडू सामील आहेत आणि ते दोन महान खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली. थेट सचिन आणि विराट यांच्या पंक्तीत गेलेल्या शुबमन गिलने शतकासह असा कोणता रेकॉर्ड आपल्या नावे केलाय, ते आपण पाहूयात. (most international hundreds by indian players at age of 24 shubman gill at 3rd position in list)
- आपल्या सर्वांनाही माहितीये की शुबमन गिल याचे वय अजूनही 25 च्या आत आहे. युवा असला तरीही त्याच्यातील कौशल्ये भल्या भल्यांना थक्क करणारी आहेत. याच जोरावर त्याने 2023 वर्ष गाजवले होते. आणि आताही त्याने शतक झळकावून युवा खेळाडू म्हणून खास विक्रम केलाय. वयाच्या 25 वर्षांच्या आत 24 व्या वर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत शुबमन गिल थेट तिसऱ्या स्थानी गेला आहे.
शुबमन गिलने 24 व्या वर्षी रविवारी इंग्लंडविरुद्ध झळकावलेल्या शतकासह 10 आंतरराष्ट्रीय शतकांचा टप्पा गाठवलाय. शुबमनच्या अगोदर 24 व्या वर्षी विराट कोहलीच्या नावे 21 आंतरराष्ट्रीय शतके होती. त्यामुळे दो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, तर 24 व्या वर्षी सचिन तेंडूलकरच्या नावे 30 आंतरराष्ट्रीय शतके होती, त्यामुळे सचिन या यादीत पहिल्या स्थानी आहे.
अधिक वाचा –
– अर्ध्यात कॉमेंट्री सोडून का गेले होते सुनिल गावसकर? खरं कारण आलं समोर, गावसकरांवर कोसळलाय दुःखाचा डोंगर । Sunil Gavaskar
– बे&%$ कोई भी गार्डन मे घुमेगा; मॉं &%$# सबकी, रोहित शर्माची शिवीगाळ कॅमेऱ्यात कैद
– IND vs ENG । भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंड 253 धावांवर सर्वबाद, एकट्या बुमराहने घेतल्या 6 विकेट्स