विशाखापट्टणम इथे भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात सुनिल गावसकर हे कॉमेंट्री करत होते. मात्र अचानक सुनिल गावसकर हे अर्ध्यातून कॉमेंट्री सोडून निघून गेले. ते अर्ध्यातून का गेले, याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. परंतू, त्याबद्दल आता खरे कारण समोर आले आहे. गावसकर यांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( IND vs ENG Test Sunil Gavaskar leaves commentary duty after mother in law dies heads to Kanpur )
भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याचे कारण, गावसकर यांच्या सासू पुष्पा मेहरोत्रा (85) यांचे शुक्रवारी कानपूर येथील राहत्या घरी निधन झाले आहे. भारत-इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या कसोटीदरम्यान सुनिल गावसकर हे समालोचन करत होते, तेव्हा त्यांना सासूच्या निधनाची माहिती मिळाली आणि ते कॉमेंट्री अर्ध्यात सोडून निघून गेले. त्यानंतर ते रात्री उशिरा कानपूरला पोहोचले. पुष्पा मेहरोत्रा यांच्या पार्थिवावर भगवतदास घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुष्पा मेहरोत्रा यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. गावसकर यांचे सासरे चामड्याच्या व्यवसायात आहेत. त्यांचे सासरे बी.एल मेहरोत्रा हे कानपूरच्या मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते. गावसकर यांनी 1974 मध्ये बी.एल मेहरोत्रा यांची मोठी मुलगी मार्शनिलशी लग्न केले. 1973 मध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान दोघांची भेट झाली होती. ( IND vs ENG Test Sunil Gavaskar leaves commentary duty after mother in law dies heads to Kanpur )
अधिक वाचा –
– पाहुण्यांची अचानक मैदानात उपस्थिती, थांबवावा लागला लागला श्रीलंका-अफगाणिस्तानमधील एकमात्र कसोटी सामना
– जसप्रीत बुमराहचा नाद यॉर्कर! स्टंप्स हवेत उडाल्यानंतर ओली पोप भलताच नाराज, पाहा VIDEO
– VIDEO । यशस्वी जयस्वालपुढे सगळे पाणी कम! इंग्लिश चाहत्यांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या