मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 89 षटकात 2 बाद 215 धावा केल्या आहेत.
भारताकडून पहिल्या दिवसाखेर चेतेश्वर पुजारा 200 चेंडूत 68 धावांवर आणि कर्णधार विराट कोहली 107 चेंडूत 47 धावांवर नाबाद खेळत आहेत.
विराटने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 60 सामन्यात 71 डावात 3216 धावा केल्या आहेत.
त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवताना व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 3173 धावांना मागे टाकले आहे.
भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 110 सामन्यात 6707 धावा केल्या आहेत.
भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
6707 धावा – सचिन तेंडुलकर (110 सामने)
3216 धावा – विराट कोहली (60 सामने)
3173 धावा – व्हिव्हिएस लक्ष्मण (50 सामने)
3071 धावा – राहुल द्रविड (72 सामने)
2589 धावा – एमएस धोनी (82 सामने)
महत्त्वाच्या बातम्या:
–रिकी पाॅटिंगच्या देशात त्याच्या आवडत्या मैदानावरच विराट मोडला पाॅटिंगचा विक्रम
–८६ वर्षांत कोणत्याही भारतीयला न जमलेली गोष्ट मयांक अगरवालने पदार्पणातच केली
–जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम