---Advertisement---

सनरायझर्स हैद्राबादचे आज नेतृत्व करणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा अनोखा विक्रम…

On: रविवार, मार्च 24, 2019 4:58 PM
---Advertisement---

कोलकता। आयपीएल 2019 च्या मोसमात आज (24 मार्च) दुसरा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात होत आहे. या सामन्यात कोलकता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्याला सनरायझर्स हैद्राबादचा नियमित कर्णधार केन विलियम्सनला खांद्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागले आहे. त्यामुळे आज हैद्राबाद संघाचे प्रभारी कर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे सोपवण्यात आले आहे.

भुवनेश्वरचा हा आयपीएलमधील कर्णधार म्हणून पहिलाच सामना आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एक अनोखा विक्रमही झाला आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करण्याआधी सर्वाधिक सामने खेळण्याच्या यादीत भुवनेश्वर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

त्याने आजच्या सामन्यात कर्णधारपद स्विकारण्याआधी आयपीएलमध्ये 103 सामने खेळले आहेत. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर आर अश्विन आहे. त्याने 111 सामने आयपीएलमध्ये खेळल्यानंतर मागीलवर्षी पहिल्यांदा कर्णधारपद सांभाळले होते. तो सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार आहे. मागील संपूर्ण आयपीएल मोसमातही त्यानेच पंजाबचे नेतृत्व केले होते.

त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारचा हा कारकिर्दीतील कर्णधार म्हणून दुसराच सामना आहे. त्याने याआधी 2016-17 च्या रणजी ट्रॉफी मोसमात मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेशचे नेतृत्व केले होते.

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करण्याआधी सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू –

111 – आर अश्विन(2018)

103 – भुवनेश्वर कुमार (2019)

97 – अजिंक्य रहाणे (2017)

92 – मुरली विजय (2016)

84 – रोहित शर्मा (2013)

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०१९: असे आहेत कोलकता-हैद्राबादचे ११ जणांचे संघ

आयपीएल इतिहासात असा पराक्रम करणारा सुरेश रैना ठरला पहिलाच खेळाडू

त्यानंतर यॉर्कर किंग लसिथ मलिंगा घेणार क्रिकेटमधून निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment