काल श्रीलंका विरुद्ध भारत संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० स्पर्धेतील सामना पार पडला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला. या पराभवामुळे श्रीलंकेने नकोसा असा विक्रम केला आहे.
आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये मायदेशात खेळताना सर्वाधिक वेळा पराभव स्विकारण्याच्या यादीत श्रीलंकेने आता दुसरे स्थान मिळवले आहे. श्रीलंका आजपर्यंत १९ वेळा मायदेशात पराभूत झाले आहे. त्यामुळे त्यांनी बांगलादेश संघाच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
बांग्लादेशनेही १९ वेळा मायदेशात पराभव स्वीकारला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून ते २१ वेळा मायदेशात पराभवाला सामोरे गेले आहेत.
विशेष म्हणजे श्रीलंकेच्या मायदेशातील १९ पराभवांपैकी १४ पराभव कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडिअमवर झाले आहेत. एकाच स्टेडियम सर्वाधिक वेळा पराभूत होण्याचा विक्रमही श्रीलंकेच्या आणि झिम्बाब्वेच्या नावावर आहे.
आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिक वेळा पराभव स्वीकारणारे संघ:
२१ – दक्षिण आफ्रिका
१९ – बांगलादेश आणि श्रीलंका
१७ – न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे
एकाच स्टेडियम सर्वाधिक वेळा पराभव:
१४ – श्रीलंका, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
१४ – झिम्बाब्वे, हरारे स्पोर्ट्स क्लब