---Advertisement---

दिल्लीचं नशीबच फुटकं! चेन्नईविरुद्ध पराभूत होताच नावावर झाला नकोसा विक्रम; प्लेऑफसाठी करावा लागेल संघर्ष

Delhi-Capitals
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग २०२२ या हंगामात संमिश्र कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ५ विजय मिळवले आहेत, तर उर्वरित ६ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सहावा पराभव त्यांना रविवारी (दि. ०८ मे) चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्धच्या सामन्यात मिळाला.या पराभवामुळे ते ९०हून अधिक धावांनी पराभूत होणाऱ्या संघाच्या यादीत सामील झाले आहेत. तसेच, आता या पराभवामुळे त्यांना पुढील ३ सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने (Delhi Capitals) नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने ६ विकेट्स गमावत दिल्लीपुढे २०९ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ १७.४ षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त ११७ धावाच करू शकला. त्यामुळे चेन्नईने हा सामना ९१ धावांनी जिंकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

चेन्नईविरुद्ध ९१ धावांनी पराभूत झाल्यामुळे दिल्ली संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ९०हून अधिक धावांनी पराभूत होणारा संयुक्तरीत्या अव्वल संघ ठरला. तब्बल पाचव्यांदा दिल्लीला या नकोशा विक्रमाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीसोबत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आहे. बेंगलोरही यापूर्वी ५ वेळा ९०हून अधिक धावांनी पराभूत झाला आहे. यानंतर संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ आहेत. हे दोन्ही संघ यापूर्वी २ वेळा ९०हून अधिक धावांनी पराभूत झाले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ९०हून अधिक धावांनी पराभूत होणारे संघ
५ वेळा- दिल्ली कॅपिटल्स*
५ वेळा- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२ वेळा- कोलकाता नाईट रायडर्स
२ वेळा- पंजाब किंग्स
० वेळा- मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीविरुद्ध २१ धावा चोपताच धोनीच्या नावावर दोन मोठ्या विक्रमांची नोंद, एकात पटकावला थेट अव्वल क्रमांक

कशी नशिबाने थट्टा आज मांडली! आधी जडेजाचं कर्णधारपद गेलं अन् आता संघातूनही केली हाकालपट्टी

वनिंदू हसरंगाचा नाद खुळा विक्रम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा बेंगलोरचा दुसरा ‘रॉयल’ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---