आज २१ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक चेंडू खेळणाऱ्या राहुल द्रविडने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिला चेंडू खेळला होता. पहिल्याच सामन्यात ९५ धावा करताना त्याने तब्बल २६७ चेंडू खेळले होते. आज महान फलंदाजाने पहिल्यांदा आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजी केल्यामुळे त्याच्याशी निगडित हे खास रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत सार्वधिक चेंडू खेळणारे खेळाडू
#१ राहुल द्रविड
भारताच्या या महान फलंदाजाने १९९६ ते २०१२ या दीर्घ कसोटी कारकिर्दीत तब्बल ३१,२५८ चेंडू खेळले. यासाठी त्याला १६४ कसोटी सामने खेळावे लागले. या ३१,२५८ चेंडूत द्रविडने १३,२८८ एवढ्या धावा केल्या. यात त्याचा स्ट्राइक रेट होता फक्त ४२.५१ परंतु सरासरी ही अतिशय चांगली अर्थात ५२. ३१ राहिली.
#२ सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर सार्वधिक कसोटी सामने तसेच एकदिवसीय सामने खेळण्याचं रेकॉर्ड आहे. द्रविडपेक्षा सचिन तब्बल ३६ कसोटी सामने जास्त खेळूनही सचिन त्यापेक्षा जवळजवळ २००० चेंडू कमी खेळला आहे. २९,४३७ चेंडू खेळताना सचिनने धावा केल्या आहेत १५,९२१. त्या द्रविडपेक्षा २००० ने जास्त आहेत.
#३ जॅक कॅलिस
जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १६६ सामन्यात २८, ९०३ चेंडू खेळले आहेत. विशेष म्हणजे द्रविडपेक्षा दोन कसोटी सामने खेळणाऱ्या कॅलिसने द्रविडपेक्षा बरोबर एक धाव कसोटी कारकिर्दीत जास्त काढली आहे. याबरोबर त्याने गोलंदाजी करताना २०३२३ चेंडू टाकले आहेत.
#४ शिवनारायन चंद्रपॉल
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनारायन चंद्रपॉल हा क्रमवारीत ४थ्या क्रमांकावर असून त्यानेही द्रविड इतकेच अर्थात १६४ सामने खेळले आहे. परंतु त्याने २७,३९५ चेंडूंचा कसोटी कारकिर्दीत सामना केला आहे. २१ वर्षांच्या दीर्घ अशा कारकिर्दीत त्याने ११, ८६७ धावा सुद्धा केल्या आहेत.
#५ अॅलन बॉर्डर
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार आणि एकवेळचा कसोटीमध्ये सर्वाधिक धावा तसेच शतकांचा विक्रम आपल्या नवे करणारा अॅलन बॉर्डर कसोटी कारकिर्दीत १५६ कसोटी सामने खेळला असून त्याने २७,००२ चेंडूंचा सामना केला आहे. एवढे चेंडू खेळून बॉर्डरने ५०.५६ च्या सरासरीने ११,१७४ धावा केल्या आहेत.