पुणे | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्द दिल्ली डेअरडेविल्स संघात झालेल्या सामन्यात काल चेन्नईने १३ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर चेन्नई गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाली.
८ सामन्यातील चेन्नईचा हा ६वा विजय ठरला. परंतु अनेक अर्थांनीही हा विजय या संघाला खास होता. त्यातील सर्वात विशेष कारण म्हणजे चेन्नईचा हा ट्वेंटी२० प्रकारातील हा १००वा विजय होता.
ट्वेंटी२० प्रकारात एक संघ म्हणून १०० विजय मिळवणारा हा दुसराच संघ ठरला. यापुर्वी केवळ मुंबई इंडियन्सने या प्रकारात १०४ विजय मिळवले आहेत. अन्य कोणत्याही देशातील संघाला आजपर्यंत १०० विजय मिळवता आले नाहीत.
चेन्नई सुपर किंग्जच्या १०० विजयात ९८ विजय चेन्नईने धोनीच्या तर २ विजय रैनाच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. धोनीने १६० सामन्यात चेन्नईचे नेतृत्व केले असून रैनाने ४ सामन्यात हे नेतृत्व केले आहे.
१६४ सामन्यात या संघाने १०० विजय, ६१ पराभव पाहिले असून २ सामने टाय तर एक सामना अनिर्णित राहिला.
नाॅटिंगशायर, लॅंशायर, वाॅरकाशायर आणि हॅंपशायर संघांनी आजपर्यंत प्रत्येकी ९५ विजय या प्रकारात मिळवले आहेत.
ट्वेंटी२० प्रकारात सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
१०४- मुंबई इंडियन्स
१००- चेन्नई सुपर किंग्ज
९५- नाॅटिंगशायर / लॅंशायर / वाॅरकाशायर / हॅंपशायर#आपलामहाराष्ट्र #महाराष्ट्रदिवस #महाराष्ट्रदिन #IPL2018 #CSKvDD @MarathiRT @MarathiBrain @BeyondMarathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) May 1, 2018