Loading...

‘शतकवीर’ रोहित शर्माची किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक वनडे सामना पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिकाही 2-1 ने जिंकली.

या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने विक्रमी शतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबच एक खास विक्रमही केला आहे. त्याने 128 चेंडूत 119 धावांची खेळी करताना 8 चौकार आणि 6 षटकार मारले. हे त्याचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 वे वनडे शतक आहे.

त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे.

विराटनेही ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 वनडे शतके केली आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करण्याचा विक्रम सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 शतके केली आहेत.

वनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –

Loading...

9 शतके – सचिन तेंडूलकर (71 सामने)

8 शतके – विराट कोहली (40 सामने)

8 शतके – रोहित शर्मा (40 सामने)

6 शतके – देडमंड हाईन्स (64 सामने)

5 शतके – फाफ डू प्लेसिस (22 सामने)

You might also like
Loading...