माऊंट मॉनगनुई। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात बे ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 324 धावांचा डोंगर उभा केला आहे.
या डावात भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांच्या जोडीने अर्धशतके करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली. धवनने 66 तर रोहित शर्माने 96 चेंडूत 87 धावा केल्या. रोहितने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.
त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विरेंद्र सेहवागसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आला आहे. या दोघांनीही न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी 16 षटकार मारले आहेत.
त्याचबरोबर या यादीत दुसऱ्या स्थानावर 14 षटकारांसह भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आला आहे. त्याने आज 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 48 धावा केल्या आहेत. त्याने सुरेश रैनाचा 13 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
भारताकडून आज विराट कोहलीने 43 आणि अंबाती रायडूने 47 धावांची छोटीखानी खेळी केली तर केदार जाधवने शेवटच्या काही षटकात धोनीला चांगली साथ देताना 10 चेंडूत 22 धावांची तुफानी खेळी केली. यामुळे भारताने न्यूझीलंड समोर 325 धावांचे आव्हान ठेवले आहे.
वनडेत न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू-
16 – रोहित शर्मा (11 सामने)
16 – विरेंद्र सेहवाग (12 सामने)
14 – एमएस धोनी (14 सामने)
13 – सुरेश रैना (10 सामने)
12 – सचिन तेंडूलकर (22 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–कर्णधार रहाणेने केली ‘अजिंक्य’ खेळी…
–शिखर धवनला सतावत आहे या गोष्टीची चिंता…
–टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल न्यूझीलंडची रणनीती…