---Advertisement---

स्टम्पिंगचा बादशहा एमएस धोनीची चपळाई पाहून फलंदाजही झाला चकीत, पहा व्हिडिओ

On: शनिवार, जानेवारी 26, 2019 4:00 PM
---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। भारताने न्यूझीलंड विरुद्ध बे ओव्हल मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 90 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 324 धावा करत न्यूझीलंड समोर विजयासाठी 325 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. त्यांनी आठ विकेट्स 166 धावांतच गमावल्या होत्या.

पण यातील मागील काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या रॉस टेलरच्या विकेटने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याला भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने अफलातून यष्टीचीत करत भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला.

18 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर केदार जाधवने फ्लिकर चेंडू टाकला. या चेंडूवर टेलर फटका मारायला चूकला त्यामुळे चेंडू धोनीच्या हातात गेला. धोनीनेही क्षणाचा विलंब न करता स्टम्पवरील बेल्स उडवल्या. यावेळी टेलरचा पाय अगदी थोड्या अंतराने हवेत असल्याचे व्हिडिओ रिव्ह्यूमध्ये दिसून आले. त्यामुळे टेलरला पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले.

https://twitter.com/manyo_rajput/status/1089066117262241792

या सामन्यात भारताकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने अर्धशतके केली. रोहितने 87 तर शिखरने 66 धावा केल्या. तसेच विराट कोहलीने 43, अंबाती रायडूने 47 धावा केल्या.

याबरोबरच शेवटच्या काही षटकात एमएस धोनी आणि केदार जाधवने आक्रमक खेळ करताना 5 व्या विकेटसाठी 26 चेंडूत नाबाद 53 धावांची भागीदारी केली. धोनीने नाबाद 48 आणि केदारने नाबाद 22 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून डो ब्रासवेलने 57 धावांची खेळी करत एकाकी लढत दिली मात्र अन्य फलंदाजांनी खास काही न केल्याने न्यूझीलंडचा डाव 40.2 षटकात 234 धावांवरच संपूष्टात आला.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2, मोहम्मद शमी आणि केदार जाधव या दोघांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

–हिटमॅन रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले अव्वल स्थान

–कर्णधार रहाणेने केली ‘अजिंक्य’ खेळी…

–शिखर धवनला सतावत आहे या गोष्टीची चिंता…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment