सेंच्युरीयन | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करताना अनेक विक्रम केले. याच सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान १७०००धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावे झाला.
हे करताना त्याने एक खास विक्रम केला आहे. तो म्हणजे वनडेत ३५ शतक करण्याचा. विराटने २०८ वनडेत ५८.१०च्या सरासरीने तब्बल ९५८८ धावा केल्या आहेत. वयाच्या २९ वर्ष आणि १०४ दिवसांचे असताना त्याने ही कामगिरी केली आहे.
तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने तिशी पार करण्यापुर्वी ३१४ वनडेत ४४.४३च्या सरासरीने १२२१९ धावा केल्या होत्या. त्यात ३४ शतके आणि ६२ अर्धशतकांचा सामावेश होता.
यामूळे विराटने सचिनचा तिशीतील हा विक्रम १ शतकाने मोडला आहे.
३५ वे वनडे शतक विराटने २००व्या डावात तर सचिनने ३०९व्या डावात केले होते. अन्य कोणत्याही खेळाडूला वनडेत ३०च्यावर शतके करता आली नाहीत.






