मॅचेस्टर। शनिवारी(22 जून) 2019 विश्वचषकातील 29 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघात पार पडला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात अखेर न्यूझीलंडने 5 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने शतकी खेळी केली. हे त्याचे या विश्वचषकातील सलग दुसरे शतक आहे. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.
त्याने या सामन्यात न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर फलंदाज पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर संघाचा डाव सांभाळताना 154 चेंडूत 148 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. हे विलियम्सनचे इंग्लंडमधील चौथे वनडे शतक आहे.
त्यामुळे त्याने इंग्लंडमध्ये पाहुण्या संघाच्या खेळाडूने सर्वाधिक शतके करण्याच्या शिखर धवन, रोहित शर्मा आणि विवियन रिचर्डसन यांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. धवन, रोहित आणि रिचर्डसन यांनीही इंग्लंडमध्ये प्रत्येकी 4 वनडे शतके केली आहेत.
हेही विक्रम झाले विलियम्सनच्या नावावर –
विलियम्सनचे न्यूझीलंडचा वनडे कर्णधार म्हणून हे सातवे वनडे शतके आहे. त्यामुळे त्याने न्यूझीलंडचा वनडे कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या स्टिफन फ्लेमिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. फ्लेमिंग यांनीही कर्णधार म्हणून 7 वनडे शतके केली आहेत.
तसेच विलियम्सन हा विश्वचषकात दोन शतके करणारा न्यूझीलंडचा तिसरा कर्णधार ठरला आहे. याआधी ग्लेन टर्नर यांनी 1975 च्या विश्वचषकात न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दोन शतके केली होती. तर स्टिफन फ्लेमिंग यांनी 2003 आणि 2007 च्या विश्वचषकात न्यूझीलंडचे नेतृत्व करताना प्रत्येकी 1 शतक असे विश्वचषकात कर्णधार म्हणून एकूण 2 शतके केली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीला आयसीसीने सुनावली मोठी शिक्षा, जाणून घ्या कारण
–३२ वर्षांनंतर असा पराक्रम करणारा शमी दुसराच भारतीय गोलंदाज
–स्टम्पिंग किंग एमएस धोनीने रचला इतिहास, केला नवा विश्वविक्रम