ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज(15 जानेवारी) दुसरा वनडे सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. हा सामना भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीसाठी खास ठरला आहे.
त्याचा हा सामना वनडे कारकिर्दीतील 334 वा सामना आहे. त्यामुळे सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये त्याने मोहम्मद अझरुद्दीन यांची बरोबरी केली आहे.
अझरुद्दीन यांनीही 334 वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे हे दोघे या यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून त्याने 463 वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या पाठोपाठ राहुल द्रविड असून त्याने 344 वनडे सामने खेळले आहेत.
धोनीने या 334 वनडे सामन्यांपैकी 3 वनडे सामने 2007 मध्ये आशिया एकादश या संघाकडून खेळले आहेत.
आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आहे.
त्यांचे सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच(6) आणि ऍलेक्स कॅरे(18) हे स्वस्तात माघारी परतले आहेत. तसेच उस्मान ख्वाजा(21) आणि पीटर हँड्सकॉम्बही(20) लवकर बाद झाले आहेत. तर शॉन मार्शचे अर्धशतक झाले आहे. ऑस्ट्रेलियाने 29 षटकात 4 बाद 136 धावा केल्या आहेत.
सर्वाधिक वनडे सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू –
463 – सचिन तेंडुलकर
344 – राहुल द्रविड
334 – मोहम्मद अझरुद्दीन
334 – एमएस धोनी
311 – सौरव गांगुली
महत्त्वाच्या बातम्या –
–मोहम्मद सिराजचे झाले टीम इंडियाकडून वनडे पदार्पण
–अँडी मरे – टेनिसचा शापित शिलेदार
–दुसऱ्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया